फक्त दोन मिनिटं मी एखाद्या शहाण्या माणसासारखा विचार केला असता तर ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कधीच लिहिली गेली नसती!
‘सात सक्कं’मध्ये आत्मचरित्राचे अंश नक्कीच आहेत. (कुठच्या कादंबरीत नसतात?) पण एका बाबतीत माझं नशीब जोरावर होतं. पहिल्या कादंबरीपासूनच मी भरपूर खोटं बोलायला लागलो होतो. माझा खोटेपणा मनाची पकड घेतो का? तो किती परिणामकारक आहे? मुद्दा असा आहे की, मी किती उत्कृष्ट खोटारडा आहे, हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे.......